गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या 9,419 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मागील १० ते १२ दिवसांपासून हि संख्या १० हजार पेक्षा कमी आहे, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या 9,419 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या २४ तासात १५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट 98.36 टक्के आहे.

तर गेल्या 24 तासांत 8,251 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार  देशात आतापर्यंत एकूण  तब्बल 3,40,97,388 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशाचा दैनंदिन पॉझिटिव्ह रेट 0.73 टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या –