Share

जाणून घ्या चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे…

Published On: 

🕒 1 min read

देवाच्या पूजेमध्ये चंदनला खूप महत्त्व आहे. याशिवाय चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही त्यास महत्त्व आहे. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. साबण, कॉस्मेटिक, परफ्यूम, अगरबत्तीसाठी त्याचा वापर होतो. चंदनाचे तेल व पावडर बाजारात मिळते. चला तर मग जाणून घेऊया चंदनाचे काही आरोग्यदायी फायदे….

-चेहरा काळवंडला असेल तर चंदनाचा लेप त्वचेवर लावावा.

-चंदन पावडर पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास शरीर ताजेतवाने होते.

मुंबईसह राज्याला हुडहुडी भरविणाऱ्या थंडीने राज्यातून घेतली माघार

-डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर चंदनाचा लेप डोळ्यांच्या खाली लावा.

-शरीराला खाज येत असल्यास अथवा त्वचेसंबंधित एखादी तक्रार असल्यास चंदन अत्यंत गुणकारी ठरते.

-तणाव दूर करण्यासाठी सुद्धा चंदनाचा उपयोग केला जातो.

जाणून घ्या डाळिंब लागवडीची पद्धत

-कमी प्रमाणात भाजल्यास अथवा चटका लागल्यास चंदन तुपात मिसळून लावावे. दाह कमी होतो.

-शरीरातील स्नायू दुखत असल्यास चंदनाच्या तेलाने मालिश करावी.

-त्वचा मुलायम आणि तजेलदार होण्यासाठी चंदन अत्यंत गुणकारी आहे.

-चेहऱ्यावर मुरूम जास्त असल्यास गुलाब पाण्यात चंदन मिसळून लेप लावा.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)आरोग्य

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या