लिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

सध्या संपुर्ण जगाला COVID 19 (करोना) या विषाणूजन्य आजाराने विळखा घातला आहे. अशा परिस्थितीत मानवी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लिंबुवर्गीय फळांचे आहारात सेवन करणे गरजेचे झाले आहे.  लिंबामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो.

लिंबु सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते, त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषाणुंपासून मुक्तता मिळू शकते. लिंबु फळाच्या औषधी गुणधर्माचा विचार करता लिंबापासून लोणचे, लेमन ज्यूस, लेमन ऑईल, लेमन पावडर अशा प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्मिती करून त्याची निर्यात करणे सुद्धा सहज शक्य आहे. त्यादृष्टीने लिंबूवर आधारीत प्रक्रिया उधोगांची उभारणी करण्याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. लिंबाचे उत्पादन आणि निर्यात याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊ फायदे…..

  • व्हिटॅमिन ‘सी’ च्या कमतरतेमुळे होणारा स्कर्व्ही रोग बरा करण्यासाठी लिंबाचा उपयोग होतो.
  • शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते व विषाणूजन्य आजारांपासून संरक्षण होते.
  • पित्त झाल्यास रोज लिंबाचे सरबत घेतल्यास पचनसंस्था सुधारते व भुक वाढते
  • नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.
  • थकवा दुर होतो, तसेच पचनक्रिया सुधारते.
  • वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या –