लिंबू पाणी पिण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे –

लिंबू पाणी पिणे हे शरीरासाठी लाभदायक असते. लिंबू पाण्यामध्ये कॅल्शियम, ऑक्सेलेट आणि युरिक ॲसिडची मात्रा जास्त असते. लिंबामध्ये असणारे पॉलीफेनॉल अँटीऑक्सीडेंट्स या घटकामुळे वजन कमी करण्यास मदत होते. रोज सकाळी  उपाशी पोटी लिंबू आणि मधाचे मिश्रण करून प्यावे. लिंबू पाणी सकाळी पिल्यावर किमान 15-20 मिनिटे काही खावू नये जेणेकरून अपेक्षित परिणाम मिळेल. वजन कमी करण्यात सहाय्यक मध – लिंबुपाणी पोट साफ करण्यासोबतच तुमचे वजन कमी करण्यासही मदत करते. यामधील पेक्टिन नामक फायबर तुम्हाला प्रसन्न ठेवते. मध – लिंबू मिश्रित पाणी पोटात अल्काईन स्थिती तयार करत असल्याने तुमचे वजन झटपट कमी करण्यास मदत होते.

वजन कमी होत नसल्यास ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात करा

  • सकाळी उठल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी घेतल्याने शरीर साफ होते.
  • सकाळी उठल्यानंतर लिंबूपाणी प्यायल्यास दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होते.
  • लिंबूपाण्यामुळे मुख दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्याने शरीर ताजेतवाने राहते.
  • लिंबू पाण्यामुळे शरीरातील पीएच लेव्हल कायम राहते.
  •  जर तुम्ही वजन कमी करत आहात तर सकाळी उठून लिंबू पाणी पिणे चांगले.

महत्वाच्या बातम्या –

बहुगुणकारी कडुनिंब, सर्व विकृतींना कडू रस हा प्रतिबंधक आणि उपचारक

रोज खा दही-भात, ‘हे’ आहेत दही भात खाण्याचे फायदे!