Skin Care | चेहरा स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care | टीम कृषीनामा: चेहरा निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनेक लोक महागडे फेसवॉश आणि क्लिनर वापरतात. मात्र हे क्लीनर आणि फेसवॉश केमिकलने भरलेले असतात. या केमिकलमुळे त्वचेला दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. फेसवॉशचा जास्त वापर केल्याने त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहऱ्याला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकतात. लिंबामध्ये विटामिन सी आणि सायट्रिक ॲसिड आढळून येते, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. लिंबू त्वचेला खोलवर स्वच्छ करतो. त्याचबरोबर लिंबाच्या वापराने त्वचेवरील पिंपल्स, डाग, पिगमेंटेशन आणि सुरकुत्या यासारख्या समस्या दूर होऊ शकतात. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी लिंबाचा पुढील प्रमाणे वापर करा.

लिंबू आणि दूध (Lemon and milk For Skin Care)

चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि दुधाचा वापर करू शकतात. कच्चा दुधामध्ये विटामिन आणि कॅल्शियम आढळून येते, जे त्वचेला पोषण प्रदान करते. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये चार ते पाच चमचे कच्चे दूध घेऊन त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर कापसाच्या मदतीने तुम्हाला हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे लागेल. साधारण पाच मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

लिंबू आणि मध (Lemon and honey For Skin Care)

मध आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. मधामध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मधाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एका भांड्यात दोन चमचे मधामध्ये पाच ते सात थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करावी लागेल. पाच मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

लिंबू आणि कोरफड (Lemon and Aloe Vera For Skin Care)

लिंबामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आणि सायट्रिक ॲसिड उपलब्ध असते. त्यामुळे एलोवेरा जेलमधील लिंबू मिसळून लावल्यास चेहऱ्यावरील मुरुमांची सूज कमी होऊन रंग साफ होण्यास मदत होऊ शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचा एलोवेरा जेलमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे फेसपॅक तुम्हाला चेहऱ्यावर मास्कप्रमाणे लावावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हा फेस पॅक किमान 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल. या फेसपॅकचा रात्री झोपण्यापूर्वी उपयोग केल्याने तुम्हाला अधिक फायदे मिळू शकतात.

बटाटा आणि लिंबू (Lemon and Potato For Skin Care)

बटाटा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे असे आपण नेहमी ऐकत असतो. त्याचबरोबर लिंबाचे देखील आपल्या त्वचेला खूप फायदे होतात. त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी बटाटा आणि लिंबाचा रस एकत्र करून दहा ते पंधरा मिनिटं त्याने त्वचेवर मसाज करा. मसाज झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने व्यवस्थित धुऊन स्वच्छ करा. यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Hair Fall | केस गळतीच्या समस्यांवर मात करण्यासाठी करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स फॉलो

Gram Suraksha Yojana | ग्राम सुरक्षा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर

Nervousness | घबराट आणि अस्वस्थ वाटतं असेल, तर करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Dry Skin Care | कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचा वापर

Rice Water | चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे तांदुळाचे पाणी, होतात ‘या’ समस्या दूर