पपईप्रमाणेच पपईच्या बियाही आरोग्यास लाभदायक

पपईमधील पोषक तत्वे आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मुख्यतः पपईचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी करण्यात येतो. परंतु याव्यतिरिक्त पपईचे शरिराला अनेक फायदे आहेत. आयर्न, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखी विभिन्न पोषक तत्व असलेल्या पपईचा त्वचेला जसा फायदा होता. तसाच शरिराला गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी देखील पपईचा उपयोग होतो. पपईसारख्याच तिच्या बियाही शरिरासाठी उपयुक्त असतात. यांचा उपयोग त्वचेची अॅलर्जी, कॅन्सर आणि लहान मुलांचे पोटाचे विकार अथवा जंत यांसारखे विकार दूर करण्यासाठी करण्यात येतो. पपईच्या बियांमध्ये अॅन्टीबॅक्टेरिअल गुण मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे शरिराचा इन्फेक्शन आणि अॅलर्जीपासून बचाव होतो. तसेच या शरिरातील विषारी घटक शरिराबाहेर टाकण्यासाठी मदत करतात.

गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये एकाही पोलीसाला कोरोना नाही

 चला तर मग जाणून घेऊयात पपईच्या बियांचे शरिराला होणारे फायदे…

  • पपई व्हिटॅमिन्सने समृद्ध असते. त्यामुळे पपईमध्ये इतर फळांपेक्षा अधिक औषधी गुणधर्म असतात.
  • पपईच्या बिया इन्फेक्शन किंवा शरीराच्या कुठल्याही भागात जळजळ, सूज किंवा दुखणं यापासून आराम देण्यास फायदेशीर आहेत.
  • पपईच्या बियांचा वापर फेसवॉश सारखा केला जाऊ शकतो. त्यामुळे चेहरा उजळतो आणि त्वचेवर झालेले इन्फेक्शन सुद्धा दूर होतात. पपईच्या बियांचा पेस्ट बनवून तुमच्या चेहऱ्यावर लावावे.

जर ऊसाचे पैसे भागवले नाही तर विधानसभेत उठवणार मुद्दा

  • कॅन्सरसारख्या रोगापासून बचाव करण्यासाठी पपईच्या बिया फायदेशीर ठरतात. या बियांमध्ये आयसोथायोसायनेट नावाचे तत्व असते. जे कॅन्सरवर उपचार म्हणून आणि कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरते.
  • पपईच्या बियांच्या सेवनाने किडनीसंबंधीच्या सर्व तक्रारी दूर होण्यास मदत होते. याच्या बिया किडनीचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. किडनी स्टोन आणि किडनीचे कार्य नीट चालण्यासाठी पपईच्या बियांचे सेवन गुणकारी मानले जाते.

महत्वाच्या बातम्या – 

मजुरांच्या बँक खात्यात सरकार टाकणार दोन हजार रुपये; अशी करा नोंदणी

कोरोना रोखण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करावी – बाळासाहेब थोरात