Share

वाटाण्यातील अनेक पोषक द्रव्ये आरोग्यासाठी लाभदायक

Published On: 

वाटाण्यातील अनेक पोषक द्रव्ये आरोग्यासाठी लाभदायक

🕒 1 min read

वाटाण्यातील अनेक पोषक द्रव्ये आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहेत. वजन कमी करण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया वाटाण्याचे काही फायदे

पचनक्रिया चांगली राहील – वाटाण्यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे चांगले प्रमाण आढळून येते. यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. अपचनाची समस्या असेल तर मर्यादीत प्रमाणात वाटाणे खा. पोटाची समस्या दूर होईल.

मागील पाच वर्षांत एकूण १५९२ शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

बळकट हाडे होतील  – यामधील सेलेनियम हाडे बळकट बनवण्यामध्ये सहायक ठरते. यामुळे आर्थरायटिस आजारापासून बचाव करण्यातही मदत होते. त्यामुळे वाटाणे सांधेदुखीमध्ये तुमची मदत करू शकतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

वाढेल प्रतिकारशक्ती – वाटाण्यात मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम आढळते. फूड एक्सपर्टच्या मते, मॅग्नेशियम शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्यात सहायक असते. त्यामुळे याच्या नियमित सेवनाने आजारांशी सामना करण्यास मदत मिळेल.

जाणून घ्या ताजे खजुर खाण्याचे फायदे….

वजनहोईल कमी – वाटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. सोबतच कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे याच्या सेवनाने पोट लवकर भरते आणि वारंवार भूक लागल्याची जाणीव होत नाही. तळलेले वाटाणे खाण्याऐवजी ते उकळून खाणे अधिक फायद्याचे ठरेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याआरोग्य

Join WhatsApp

Join Now
वाटाण्यातील अनेक पोषक द्रव्ये आरोग्यासाठी लाभदायक

🕘 संबंधित बातम्या