आता ग्रामपंचायतीचे शंभर टक्के कर भरल्यावर मिळणार बक्षीस

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत (GramPanchayat) नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हीला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.

तसेच संपूर्ण गावाचा कारभार ग्रामपंचायत (GramPanchayat) पाहत असते. गावातील कामे, कर वसुली असे बरेच काम ही ग्रामपंचायतसांभाळत असते. जर गावकऱ्यांनी कर वेळेवर नाही भरला तर त्याचा परिणाम विकास कामावर होत असतो. अशीच अवस्था आता मावळ तालुक्यातील घोणशेत ग्रामपंचायतीची झाली आहे. त्यामुळे आता थकीत कर वसुलीसाठी मावळ तालुक्यातील घोणशेत ग्रामपंचायतीने एक शक्कल लढवली आहे. जे येत्या २४ जानेवारीपर्यंत कर भरतील त्या प्रत्येक करदात्याला घोणशेत ग्रामपंचायतीचे सरपंच अंकुश खरमारे यांच्याकडून आकर्षक बक्षीस देण्याचा निर्णय  घेतला आहे. २४ जानेवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जे खातेदार १०० टक्के कराचा भरणा करतील, त्या सर्वांची नावे चिठ्ठीत लिहून लकी ड्रॉ पद्धतीने एक  चिठ्ठी काढण्यात येणार आहे. तसेच त्या चिठ्ठीतील व्यक्तीचे नाव २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता जाहीर करण्यात येईल. चिठ्ठीतील व्यक्तीला २६ जानेवारी रोजी रोख रक्कम दहा हजार रुपये वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील गावातील थकीत करांचा आकडा जवळपास १५ लाखांच्या घरात आहे. याचा परिणाम विकास कामावर होत आहे. जबरदस्ती अथवा जप्तीच्या मार्गाने थकीत कर वसुली करण्याऐवजी एका वेगळ्या संकल्पनेचा उपयोग करून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा ग्रामपंचायतीच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे.

तसेच घोणशेतचे सरपंच अंकुश खरमारे म्हणतात की, थकीत कराचा विकास कामावर खूप मोठा परिणाम होत आहे.गावातील करदात्यांना वेळोवेळी सूचना देऊनही अपेक्षित वसुली झालेली नाही. म्हणून मी ही नावीन्यपूर्ण संकल्पना सुरू केली आहे. याचा करवसुली नक्कीच फायदा होईल.

महत्वाच्या बातम्या –