सीताफळ एक गुण अनेक, जाणून घ्या फायदे

सीताफळ एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. या फळात अनेक गुणकारी तत्त्व असून, त्याबाबत आपण जाणून घेऊयात. सीताफळा पासून अनेक पदार्थ बनविले जातात.

सीताफळाची वेगळी लागवड करावी लागत नाही.सीताफळ हे सहसा कोठेही उगविणारे फळ आहे.

डोळ्यांसाठी लाभदायक – सीताफळात विटॅमिन-सी आणि विटॅमिन-ए असल्याने डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी आहे. यामुळे दृष्टी वाढविण्याचे काम होते.

पचनशक्ती वाढते – यात तांबे आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचनशक्ती वाढण्यास मदत होते. सोबतच फायबरमुळे गॅस आणि असिडिटीपासून आराम मिळतो.हृदयास सुदृढ ठेवते- यातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम ब्लड-कोलेस्ट्रोलला कमी करतात त्यामुळे हृदय सुदृढ राहण्यास मदत होते.

थकवा दूर घालवितो – या फळातील गुणकारी तत्त्वांमुळे ऊर्जा मिळून आपला थकवा मिनिटातच दूर होतो.गर्भवती महिलांसाठी लाभदायक- गर्भावस्थादरम्यान होणारा मूड स्विंग, मॉर्निंग सिकनेस आणि आळस अशा समस्या सीताफळ खाल्ल्याने दूर होतात.

सीताफळाच्या बिया अतिशय गुणकारी आहेत. या बिया बारीक वाटून रात्री डोक्याला केसांच्या मुळांना लावाव्या. नंतर डोक्याला घट्ट फडके बांधावे. सकाळी डोक्यावरून नहावे. म्हणजे डोक्यातील उवांचा नायनाट होतो. पण ते केस धुतल्याचे पाणी डोळ्यात अजिबात जाऊ देऊ नये. अपायकारक आहे.लघवी अडणे, लघवी साफ न होणे, लघवीची आग यावर झाडाची मुळी उगाळून चाटावी. खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी समाधान न होणे यावर सीताफळे खावीत.

महत्वाच्या बातम्या –