कोरडे बदाम खाताय? त्यापेक्षा भिजवलेले बदाम खा; भिजवलेले बदाम आरोग्यास लाभदायक

रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला अनेकजण देतात. मात्र यामागचे नेमके कारण काय  हे अनेकांना माहित नसते. मग जाणून घ्या भिजवलेल्या बदामांचे आरोग्यदायी फायदे.

‘खजूर’ खाल्याने टाळू शकता हे आजार!

बदाम हे आरोग्यदायी आहेत. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड यांनी परिपूर्ण असते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पण हे सारे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून  घेण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात भिजवणे फार गरजेचे आहे. बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही एन्जाईम्समुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच त्यांना रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला बदामांतून अधिकाधिक पोषणता मिळण्यास मदत होते.

सोने नव्हे तर शेतकऱ्याची चार एकरांतील ज्वारीची कणसेच गेले चोरीला

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे –

  • भिजलेल्या बदामाचे सेवन केल्याने गर्भातील शिशूच्या मस्तिष्क आणि न्यूरोलॉजिकल सिस्टमला फायदा होतो. कारण यात फॉलिक ऍसिडची भरपूर मात्रा असते.
  • बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपताना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते.
  • बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो.

डागरहित त्वचा हवी आहे?? तर मग पाण्यात मिसळा ‘हे’ पदार्थ

  • मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
  • केसांच्या आरोग्यासाठी देखील डॉक्टर्स रोज भिजवलेला बदाम खाण्याचा सल्ला देतात.
  • गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्यासोबतच गर्भाच्या वाढीसाठीदेखील फार आरोग्यदायी आहेत. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ करण्यास मदत करतात.

मराठीतलं अधिकाऱ्यांना कळंना आणि इंग्लिश-हिंदी शेतकऱ्यांना येईना 

  • आजकाल तणावग्रस्त जीवनशैली तसेच वेळीअवेळी खाल्ल्याने शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.  यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढल्याने हृदयविकार जडण्याची समस्या बळावत आहे.  बदामांमुळे शरीरातील ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी होऊन ‘गुड’ कोलेस्टेरॉल वाढते.

youtube.com/watch?v=EviEJC_cZjM&t=42s

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य संतुलित राहण्यासाठी हे आहेत बीटाचे फायदे

जाणून घ्या अक्रोडचे गुणकारी फायदे