Share

परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल

Published On: 

🕒 1 min read

पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गाजराची ४०० क्विंटल आवक होती. गाजराला प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक असताना, प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २० क्विंटलला आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १२०० रुपये दर मिळाले.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा १००० ते ४४०० रुपये प्रतिक्‍विंटल(

काकडीची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यामध्ये वाटण्याची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ३२०० रुपये दर मिळाले.गवारीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. चवळीची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. वालाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

 खानदेशात लाल कांद्याची आवक वाढली

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकड्याला ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १५०० रुपये दर मिळाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बाजारभाव (Market Prices) बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या