राजारामबापू साखर कारखान्याने जिंकली 7/12 ची लढाई

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिट नं.३ चे ७/१२ चे उतारे, व मालमत्तेवरील नोंदी वाळवा उप विभागाचे प्रांताधिकाऱ्यांनी काल (मंगळवार) पूर्ववत बदलून दिल्या आहेत. शेवटी न्यायालयीन लढाईमध्ये सत्य हेच विजय झाले आहे. न्यायालयीन लढाईमध्ये सत्याचा विजय झाला आहे. यामुळे आमचे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक कंत्राटदार व हितचिंतकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.

श्री.पाटील म्हणाले की , विष्णू तुकाराम पाटील (रा.कर्नाळ) व इतर दोन साथीदारांनी सर्वोदय सहकारी साखर कारखाना,व राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना या दोन साखर कारखान्यामधील कराराबाबत राज्याचे सहकारमंत्री यांच्याकडे निवेदन दाखल केले होते. या निवेदनाच्या संदर्भांत त्यांनी तीन बैठका घेतल्या होत्या.

हा संदर्भ घेवून सहकार, पणन,व वस्त्रोद्योग विभागाचे उप सचिवांनी दि.२५ जानेवारी २०१९ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र्र जमीन महसूल अधिनियम तरतुदीचे पालन न करता राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखानाच्या कारंदवाडी युनिट नं.३ च्या नावावरील ७/१२ उतारे,व मालमत्तेवरील नोंदी रद्द करून सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या नावावरती करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने मा.उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मा.उच्च न्यायालय,मुंबई यांच्याकडे दि.५ फेब्रुवारी २०१९ रोजी सदर आदेशास स्थगिती दिली होती.

उपजिल्हाधिकाऱ्यांनी 24 जानेवारी 2020 रोजी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने केलेले अपील मान्य करून सर्वोदय सहकारी साखर साखर कारखान्याच्या नावावर केलेले 7/12 उतारे व मालमत्तेवरील नोंदी पूर्ववत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कारंदवाडी युनिट नं.3 च्या नावावरती करण्याचे आदेश पारित केले होते.

या आदेशानुसार प्रांताधिकाऱ्यांनी आज पूर्ववत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कारंदवाडी युनिट नं.3 च्या नावावरती 7/12 उतारे व मालमत्तेच्या नोंदी केल्या आहेत.” यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, संचालक श्रेणीक कबाडे, विराज शिंदे, माणिक शेळके, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर प्रामुख्याने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

मासे साठविण्यासाठी १० हजार शीतपेट्या उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करणार- मुख्यमंत्री

प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्यांसाठी नेमलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत सादर करणार -कृषिमंत्री

शासकीय नोकरीत दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षण – राज्यमंत्री दिलीप कांबळे