जयभवानी सहकारी साखर कारखाना उसाला देणार 2400 रुपये भाव

जयभवानी सहकारी साखर कारखाना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिला. दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या हंगामात उसाला 2400 रुपये भाव देणार असल्याची माहिती जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी दिली.

कारखान्याच्या 37 व्या गळीत हंगामाची सुरवात झाली.  पंडित, दत्ता महाराज गिरी, माजी अध्यक्ष जयसिंग पंडित, उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. पंडित म्हणाले, या वर्षीचा गळीत हंगाम अतिशय कठीण असून या गळीत हंगामात दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली नव्हती; परंतु जे काही उसाचे उत्पादन झाले आहे तो ऊस तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखान्यास द्यावा. यावर्षी गाळप चांगले झाले तर पुढील हंगामात कोजन प्रकल्प हाती घेण्यात येईल.

या वेळी दत्ता महाराज गिरी, कार्यकारी संचालक दत्तात्रय टेकाळे यांचीही भाषणे झाली. संचालक भाऊसाहेब नाटकर, संभाजीअण्णा पंडित, पाटीलबा मस्के, तुळशीदास औटी, प्रकाश जगताप, श्रीराम आरगडे, शेषेराव बोबडे, शेख मन्सूर, श्रीहरी लेंडाळ, शेख मुनीर, राजेंद्र वारंगे, संदीपान दातखिळ, शिवाजीराव कापसे, जगन्नाथ दिवाण, संचालिका संध्याताई आसाराम मराठे यांच्यासह संचालक मंडळ तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी फुलचंद बोरकर,

शाम येवले, सभापती जगन पाटील काळे, बाबूराव काकडे, झुंबर निकम, विश्वांभर बप्पा काकडे, कुमारराव ढाकणे, चंद्रकांत पंडित, ऋषिकेश बेद्रे, जालिंदर पिसाळ, कार्यकारी संचालक के. एल. क्षीरसागर उपस्थित होते. महादेव चाटे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक श्रीराम आरगडे यांनी आभार मानले.

महत्वाच्या बातम्या –

महायोजना शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना निश्चितच होणार फायदा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी – शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे

कारखानदार प्रतिनिधींच्या बैठकीला दांडी मारून राजू शेट्टींनी घेतली शरद पवारांची भेट

अंबड तालुक्यतील शेतकऱ्याने बाजारी, सोयाबीन टाकले जाळून