दिवसाची सुरवात करा या 7 गोष्टींनी

१. सकाळी कोमट पाणी प्या. यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. पाण्यात थोडं लिंबू आणि मध घालून प्यायलात तर जास्त फायदा होईल. पोट साफ झालं तर दिवस चांगला जातो, याचा अनुभव तुम्हाला असेलच.

२. मोबाईलवर गजर लावून snooz करायची सवय टाळा. ती दहा मिनिटं आणखी झोपायचं मन करतं हे खरं पण त्यामुळेच अंगात आळस भरतो आणि तो दिवसभर टिकतो.

स्ट्रेट हेअर साठी उत्तम उपाय

३. इतर कामांना सुरुवात करण्यापूर्वी चांगला ब्रेकफास्ट करा. ताजी फळं, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ यांचा न्याहारीत समावेश अवश्य करा.

४. सकाळी कुठलंही इतर काम करण्यापूर्वी किमान 5 ते 10 मिनिटं दीर्घ श्वसन किंवा प्राणायाम करा. एकाग्र चित्त करून प्राणायाम केलात तर नकारात्मक विचारांचा मनातून निचरा व्हायला मदत होते.

५. गजर लावून ठरलेल्या वेळेत उठण्याचा प्रयत्न करा. उठल्याबरोबर उशीर झाल्याने होणारी चिडचिड यामुळे वाचेल. नियमितपणे एकाच वेळी उठायचा प्रयत्न केला तर शरीराला त्याची सवय होते आणि आपोआप जाग येते.

‘स्ट्रेस’वर रामबाण उपाय

६. सकाळी स्वतः बनवलेला चहा किंवा कॉफी घेऊन पाहा. त्यातून एक वेगळी ऊर्जा मिळेल.

७. सकाळी लवकर उठलात तर किमान 45 मिनिटं बाहेर मोकळ्यावर चालण्याचा व्यायाम किंवा जॉगिंग करून या. सकाळच्या वेळी आळसामुळे शरीर नको म्हणेल, तरीही अवश्य बाहेर पडा.