Trade in Agriculture

कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे

कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यास गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये या वृक्षाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कडुनिंबाचे वृक्ष भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशात प्रामुख्याने आढळतात. कडुनिंब ...

माहित करून घ्या नारळ जाती, लागवडीबाबत माहिती….

नारळाची एक वर्ष वयाची, आखूड व जाड बुंधा असलेली, पाच ते सहा पानावरील, निरोगी रोपे लागवडीसाठी निवडावीत. दोन ओळी व झाडांत ७.५ मीटर अंतर ...

जांभूळ लागवड पद्धत, जाणून घ्या फक्त एका क्लिक……

जांभूळ हे फळ महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेले परंतु दूर्लक्षित असे कोरडवाहू सदाहरित फळझाड आहे. फळे आंबट, गोड तुरट लागतात. जांभळाच्या बियांचा, फळांचा आणि सालीचा ...

अर्जेंटिनाच्या राजदूतांनी घेतली दादाजी भुसे यांची भेट; कृषि क्षेत्रातील परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यावर भर देणार

मुंबई – अर्जेंटिनाचे राजदूत ह्युगो झेवियर गोब्बी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषि मंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी कृषि विभागाचे सचिव एकनाथ ...

सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून योजनांची प्रभावी अंमलबजवाणी करा – हसन मुश्रीफ

पुणे – राज्यातील शेतकरी, वंचित, सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन ...

‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत अनाथ मुले व विधवांना मिळणार लाभ – गुलाबराव पाटील

जळगाव – कोरोना विषाणूमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या आणि विधवा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या बालकांच्या मागे राज्य शासन ‘आधारवड’ म्हणून ...

शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कारवाई करावी – बाळासाहेब पाटील

मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी करून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, ऊस पीक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करुन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्यास ती रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकारच्या गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. तसेच कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी मोबाईल फोन/व्हॉटसॲप क्रमांक जारी करावा व याबाबतची माहिती शेतकऱ्यांना होण्याकरिता प्रसिद्धी द्यावी. सर्व सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक व खासगी साखर कारखान्यांचे व्यवस्थापक/मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तक्रार निवारण अधिकारी यांचे नाव, संपर्क मोबाईल क्रमांक यांची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी होत असलेल्या गावांमध्ये दर्शनी ठिकाणी व ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. तसेच प्रसिद्धीमाध्यमांद्वारे व्यापक स्वरूपात प्रसिद्ध करावी. शेतकऱ्यांची लेखी स्वरूपात अशी तक्रार साखर कारखान्याच्या शेती अधिकारी यांचेकडे आल्यानंतर त्यावर लगेच कार्यवाही करावी. तसेच तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयाच्या [email protected] या ईमेलचा वापर करावा. तक्रारीमध्ये आर्थिक पिळवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव व वाहन क्रमांक नमूद करावा. अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर चौकशी करून तक्रारीचे वेळीच निराकरण करावे. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास सदरची रक्कम संबंधित मुकादम / कंत्राटदार यांचे बिलातून वसूल करून संबंधित शेतकऱ्यास अदा करावी, याची जबाबदारी तक्रार निवारण अधिकारी यांच्यावर सोपविण्यात यावी, असे निर्देशही श्री.पाटील यांनी दिले. अशा प्रकारची एकही तक्रार चालू गाळप हंगामात येणार नाही याची कार्यकारी संचालक व खासगी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापक/ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. तसेच राज्यात चालू 2021-22 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसांत गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता असल्याने व इथेनॉल उत्पादनाकरिता साखर वळविली जाणार असल्याने शेतक–यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत घाबरुन जाऊ नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालयाचे स्तरावरही ऊस गाळपाचे संदर्भात नियमितपणे आढावा घेण्यात यावा, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत. महत्वाच्या बातम्या –  बाधित शेतकऱ्यांना मदत करणार – सुभाष देसाई सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस ...

मानव विकास कार्यक्रमातील २३१ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी एसटी महामंडळाला – अनिल परब

मुंबई – परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमातंर्गत दुसऱ्या टप्प्यातील २३१ कोटी ३० ...

मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना (NAPDDAR) राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई – मादक पदार्थांचे सेवन व गैरवर्तन ही समस्या वाढत असून या समस्येच्या मुख्य कारणांमध्ये मुख्यतः मानसिक तणाव, जीवनशैलीतील बदल, सामाजिक व आर्थिक कारणे ...

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जळगाव – जिल्ह्यातील रूग्णांना चांगल्या आरोग्य सेवेबरोबरच यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी रूग्णवाहिका महत्वपूर्ण असून जिल्ह्यास अजून रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका ...