Share

कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे

Published On: 

कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे

🕒 1 min read

कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यास गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये या वृक्षाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कडुनिंबाचे वृक्ष भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशात प्रामुख्याने आढळतात. कडुनिंब वृक्ष नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. या झाडाची पाने, फळे, बिया अत्यंत कडू असतात. आयुर्वेदानुसार जंतुनाशक, सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वर, महारोग, बाळंतरोग, अफूच्या उतारासाठी, जखम, मुळव्याध, मधुमेह इ. रोगांवर कडुनिंबाचे झाड फायदेशीर आहे. कडुनिंबाचे झाड ज्या ठिकाणी जास्त असते तेथील हवा फार शुद्ध राहते.

  • कडुनिंबाच्या काडीने दात घासल्यास दातांचे विकार होत नाहीत. त्याचप्रमाणे दातांना बळकटी येते.
  • उन्हाळ्यात कडुनिंबाचं रस प्यायल्याने उन्हाचा त्रास होत नाही.
  • कडुनिंबाची पाने धान्यात घालून ठेवल्यास धन्याला कीड किंवा अळी लागत नाही.
  • रोज ग्लासभर हा रस प्यायल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
  • कडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे लावल्याने केसांची वाढ जोमाने होते. केसांच्या अनेक समस्या दूर होतात.
  • पोटात जंत झाले तर पानांचा रस काढून एक चमचा रसात थोडे गूळ घालून तीन दिवस प्याल्यास जंत बाहेर पडतात.
  • सौंदर्य प्रसाधने, दंतमंजन यांमध्ये देखील कडुनिंबाचा वापर करण्यात येतो.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे

🕘 संबंधित बातम्या