पेरणी करताना विजेच्या धक्क्याने बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू, मुलाला साहेब करण्याचं स्वप्न अधुरं 

उस्मानाबादेत जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बोर्डा येथील रामेश्वर मनोहर शेळके या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. शनिवारी  पेरणी सुरु असताना ही दुर्देवी घटना घडली. त्यामध्ये बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

रामेश्वर शेळके हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी शेतीसोबतच ते मजुरीचे कामही करतात. दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीची लगबग सुरु आहे. चार पैसे मिळावेत यासाठी बोर्डा येथीलच अनंत भगवान शेळके यांच्या शेतात  पेरणीच्या कामासाठी ते गेले होते. यावेळी ही दुर्घटना घडली.

शेतात ऊभ्या असलेल्या विजेच्या खांबाला तारेचा आधार असतो. त्यामध्ये करंट उतरला होता. पेरणी सुरु असताना बैलाचा खांबाच्या तारेला स्पर्श झाला. यावेळी बैलाला वाचवण्यासाठी गेले असता. बैलासह त्यांचा मृत्यू झाला. रामेश्वर शेळके यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा आदित्य यावर्षी दहावीच्या वर्गात शिकत आहे. तर एक मुलगी  12वी च्या वर्गात आहे.  मुलाला खुप शिकवण्याची रामेश्वर यांची ईच्छा होती.  त्याला चांगल शिकवायचं आणि साहेब करायचं अशी इच्छा ते बोलून दाखवत असत. मात्र या दुर्घटनेमुळे मुलाला साहेब करण्याचं त्यांचं स्वप्न अधुरचं राहिलं. रामेश्वर यांच्या अशा अकाली जाण्य़ाने कुटुंबाचं छत्र हरवलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँका, बोगस बियाणे उत्पादकांवर कठोर कारवाई – रामदास कदम

औरंगाबाद व लातूर विभागात पीकविमा योजनेतील घोटाळ्याची कबुली दिली : मुख्यमंत्री