व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवतील हे घरघुती उपाय

बरेचसे व्हायरल आजार हे श्वासाद्वारे किंवा दुषित अन्नपदार्थ किंवा पेय घेतल्याने पसरतात. व्हायरल फिव्हरचे विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर रक्ताद्वारे शरीरात पसरतात आणि सुप्त अवस्थेमध्ये राहतात (ज्याला आपण वैयक्तिक भाषेत इनक्युबेशन पिरेड असे म्हणतो). रक्तामध्ये एक ठराविक मात्रा आढळल्यानंतर त्यांची लक्षणं दिसून येतात. यामध्ये सुरुवातीस तीव्र स्वरूपाचा ताप, अशक्तपणा जाणवणं, अंगदुखी हाता-पायांमध्ये वेदना होणं ही प्राथमिक लक्षणं दिसून येतात.

थंडीमुळे अनेकदा सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव असे अनेक आजार होतात. एकमेकांमुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका देखील असतो. अशा इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे हिवाळ्या सर्दी-खोकला, तापापासून लांब राहण्यासाठी काही काही घरघुती टिप्स नक्की पाळल्या पाहिजेत.

तुम्ही काय खाता, पिता, कशाप्रकारे खाता या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले जाते. अशा आजारांपासून वाचण्यासाठी घरघुती उपचार देखील महत्वाचे ठरतात.

चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत ते उपाय –

मध आणि आलं –

आल्यामध्ये अॅन्टी-इंफ्लमेटरी गुण असतात. जे ताप आणि सर्दीपासून बचाव होण्यासाठी फायदेशीर ठरतात. सोबतच घशात होणारी खवखव, श्वास घेण्यास होणाऱ्या त्रासापासूनही बचाव होऊ शकतो. व्हायरल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी हा उत्तम उपाय ठरु शकतो.

तुळस आणि काळी मिरी –

तुळस रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते. अस्थमा, आर्थराइटिसचा त्रास दूर करण्यासाठी मदत होते. सर्दी-खोकल्यावरही तुळस गुणकारी आहे. काळी मिरीमध्ये असणारे अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-बायोटिक गुण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

हळद – 

एक ग्लास गरम पाण्यात चिमुटभर हळद मिसळून रोज सकाळी पिणं फायद्याचं ठरु शकतं. लिव्हरसाठी हे पाणी गुणकारी आहे. लिव्हरमधील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी याची मदत होते. हळदमध्ये अॅन्टी-व्हायरल आणि अॅन्टी-बॅक्टेरियल गुण असल्याने ते व्हायरल इन्फेक्शनवर लढण्यासाठी सक्षम बनवतात. व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी मदत करतात.

आवळा –

थंडीच्या दिवसांत आवळ्याचं सेवन फायदेशीर ठरतं. आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन असतं. आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासह पचनक्रियाही सुधारण्यास मदत करतं. व्हायरल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठीही याचा फायदा होतो.

लसून –

आरोग्यासाठी लसून वरदान मानला जातो. लसूनमध्ये असणारे अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-फंगल गुण अनेक आजारांपासून सुरक्षा कवच प्रदान करतात. जे लोक दररोज लसनाचं सेवन करतात त्यांना व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो. रोज सकाळी २ पाकळ्या लसून खाणं फायदेशीर ठरु शकतं.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……

‘पानी फाऊंडेशन’च्या उपक्रमास राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य – उद्धव ठाकरे

नागपूरच्या कळमना बाजारात मृग संत्र्याची आवक सुरू

जाणून घ्या अक्रोडचे गुणकारी फायदे