‘हा’ उपाय केल्याने घरबसल्या दहा मिनिटात मिळेल पार्लरसारखा ग्लो, जाणून घ्या

मुंबई : आपल्याला वर्षभर उपलब्ध होणारे फळ म्हणाले पपई. पपईचे अनेक फायदे देखील आपल्याला माहिती असतील. तसेच पपई मुळे अनेक रोगांपासून देखील आपले संरक्षण होते. याचप्रमाणे अनेक गुणधर्म पपईमधून मिळतात. पपईमध्ये असलेले व्हिटामिन c, व्हिटामिन E आणि बीटा क्यारोटीनसारखे अँटी ऑक्सिडंट असतात.

ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि व्हिटामिनमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. यामुळे आपण अधिक काळासाठी तरुण दिसू शकतो. पपईमध्ये उपलब्ध असलेले क्यारोटीन हे फुफ्फुस व तोंडाच्या कॅन्सरपासूनदेखील बचाव करते. आज आम्ही तुम्हाला पपईचा फेस पॅक सांगणार आहोत यामुळे तुमच्या त्वचेला काही मिनिटांमध्येच ग्लो येईल.

साहित्य : पपईची एक फोड घ्या, तीन चमचे गुलाब पाणी, दोन चमचे मध,  दोन चिमूटभर हळद

कृती : सर्वप्रथम पपईची पेस्ट बनवा आणि त्यात गुलाब पाणी, मध आणि हळद मिसळा. बर्फाच्या ट्रेमध्ये तयार पेस्ट भरून फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर हे आइस क्यूब्स आपल्या चेहऱ्याला लावा, मात्र, या आइस क्यूब्स चेहऱ्याला लावण्याचा अगोदर चेहरा स्वच्छ करून घ्या. हे तुम्ही आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला लावले तर चेहऱ्यावर ग्लो येईल.

महत्वाच्या बातम्या –