‘हा’ त्रास असणाऱ्यांनी करू नये उपवास, जाणून घ्या

उपवासात   शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवता येते. मात्र जर कोणी मधूमेह (डायबिटीज) आणि उच्च रक्तदाब (हाय ब्लडप्रेशर)चा रुग्ण असेल तर उपवास ठेवताना त्याने थोडा विचार करायला हवा. अशा व्यक्तींना उपवास करण्याआधी आपल्या डॉक्टरांकडूनदेखील आवश्य सल्ला घ्यायला हवा.

ज्यांची साखर अनियंत्रित राहते त्यांनी उपवास करू नये. जे आहार आणि व्यायाम यांचे संतुलन व्यवस्थित ठेवतात, अशा मधुमेहाच्या रुग्णांना उपवासाशी संबंधीत धोके कमी असतात. त्यामुळे असे व्यक्ती उपवास करू शकतात.

जे औषधीद्वारे साखर नियंत्रणात ठेवतात ते देखील नवरात्रीचे उपवास ठेऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांना उच्च रक्तदाब तसेच जुलाबचा धोका असतो, त्यामुळे त्यांनी उपवासात नारळ पाणी, निंबू पाणी, लस्सी घेतली पाहिजे. नवरात्रात अनेकजण मीठ वर्ज्य करतात. आठ-नऊ दिवस मीठाशिवाय राहिल्यास थकवा जाणवतो आणि रक्तदाब कमी होतो. त्यामुळे याकाळात सेंधी मीठ सेवन करता येईल.

या ‘4’ कारणांसाठी उपवास करणं फायदेशीर ठरू शकतं ..

डीटॉक्सिफिकेशन – आयुर्वेदानुसारही अनेक आजारांचं मूळ हे शरीरात साचून राहणारे घातक/विषारी घटक हे आहे. त्यामुळे उपवास केल्याने पोटाला आराम मिळतो आणि घातक घटक  बाहेर पडण्यास मदत होते.

मन शांत होते –  वातावरणाचा,गुरूत्वाकर्षणाचा मानवी शरीरावर परिणाम होतो. त्यातूनच मूड स्विंग्स तयार होतात. मानसिक ताणतणाव वाढला की चिडचिड, मत्सर यासारख्या भावनाही वाढतात. उपवास केल्याने पोटात अ‍ॅसिड बिल्डअप वाढतो. त्यामुळे अनेक अनेक समस्यांवर नियंत्रण ठेवणं सुकर होते.

उर्जा मिळते –  शरीर आणि मन डिटॉक्स झाल्यानंतर त्यामधून शरीरालाही उर्जा मिळते. अधिक प्रसन्न आणि रिफ्रेशिंग वाटते.

पचनसंस्थेचे कार्य सुधारते – फळं आणि हलका आहार घेऊन उपवास केल्यास पचनकार्यालाही चालना मिळते. पचनसंस्थेवर आलेला दाब थोड्या प्रमाणात हलका करण्यास मदत होते.

उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ?

उपवास करताना आहाराचं, व्यायामाचं आणि आरोग्याचं गणित सांभाळा. खूप थकवणारे व्यायाम, कामं टाळा. खूप तेलकट किंवा सतत खातं राहणं टाळा. त्याऐवजी राजगिरा थालिपीठ, फळं असा हलका आहार घ्या. यामुळे पचनकार्यावर भार येणार  नाही. खाण्यासोबतच मुबलक पाणी किंवा लस्सी, ताक यासारखे पेययुक्त पदार्थ आहारात ठेवा.

महत्वाच्या बातम्या –