अवकाळी निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची शेतकऱ्यांची मागणी

शेतकरी

गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन सहा महिनेझाले असून सुद्धा अजूनही मुखेड परिसरातील शेतकरी निधीपासून वंचित असल्याचे चित्र दिसून येत आहे. आधीच अवकाळी पावसाने आणि खरीप हंगामाने शेतकऱ्यांची परीक्षाच घेतली. त्यामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे.

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या

संबंधित प्रशासनाने तत्काळ अवकाळी निधी शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात वर्ग करण्याची मागणी होत आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने हेक्टरी आठ हजार तर फळबागांसाठी सोळा हजार रुपये जाहीर केले होते. मात्र अद्याप सुद्धा शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळविण्यासाठी शासन दरबारी चकरा मरावं लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महसूल आणि कृषी विभागातीलअधिकारी यांनी याबाबत गांभीर्याने विचार करीत शेतकरी हित साधण्याची मागणी शेतकरी वर्ग कडून करण्यात येत आहे.