🕒 1 min read
नवी दिल्ली – प्रधानमंत्री किसान (PM-Kisan) योजनेचा दहावा हप्त्या कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार (Modi government) कडून शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट आहे, पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता उद्या १ जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. उद्या १ जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत.
येत्या 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीं पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता हस्तांतरित करण्याची घोषणा करतील. पंतप्रधान किसान (PM-Kisan) योजनेचे आत्तापर्यंत 9 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत तब्बल 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
पंतप्रधान किसान योजनेचे पुढीलप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा – यासाठी प्रथम तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा. नंतर त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल. त्यानंतर शेतकरी कॉर्नर विभागात, लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा. मग त्यानंतर तुम्ही ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर तुम्ही ‘Get Report’ वर क्लिक करा. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी कशी करावी? जाणून घ्या
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी आपण घरून नोंदणी करू शकता. यासाठी तुम्ही PM Kisan संकेतस्थळावर https://pmkisan.gov.in/ वर जा. यानंतर Farmers Corner’ अंतर्गत ‘Beneficiary Status’वर क्लिक करा. यासाठी आपल्याकडे आपल्या शेताचा सातबारा, आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल. हे केल्या नंतर तुम्हाला याचा लाभ मिळेल का याची माहिती मिळेल. प्रधानमंत्री किसान योजना.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ?
- खुशखबर! पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
- राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश नसेल तर, तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ आजार
- 31 डिसेंबर २०२१ व नवीन वर्षाची मार्गदर्शक सूचना जारी
- शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – बच्चू कडू






