Share

चांगली बातमी – देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर जगात कोरोनाचा कहर सुरूच आहे.

तर आता एक चांगली बातमी आहे कि मागील २० दिवसापासून आता कोरोना (Corona) रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. तर देशातील कोरोना रुग्णसंख्येत चांगलीच घट झाली असून देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 5 हजार 784 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळे (Corona) 252 लोकांचा मृत्यू झाला. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्णाची संख्या 41 वर गेली आहे.

तर सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 88 हजार 993 झाली आहे. आतापर्यंत देशात तब्बल  4 लाख 75 हजार 888 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात गेल्या २४ तासात  7 हजार 995 कोरोनाबाधित बरे झाले होते. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 38 हजार 763 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या