Vitamin Deficiency | ‘या’ विटामिनच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर वाढतात पांढरे डाग

Vitamin Deficiency | टीम महाराष्ट्र देशा: तुम्ही अनेकदा अनेक लोकांच्या चेहऱ्यावर पांढरे डाग बघितले असतील. लाखो प्रयत्न करूनही हे डाग साफ होत नाही. त्यामुळे अनेक लोक महागडे उत्पादनांची मदत घेऊन हे डाग दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण हे डाग काही केल्या दूर होत नाही. कारण या डागांमध्ये कुठेतरी शरीरातील विटामिन (Vitamin) ची कमतरता (Deficiency) कारणीभूत असते. त्यामुळे हे पांढरे डाग बाहेरून काढणे कठीण होते. अनेकजण हे डाग काढण्यासाठी रसायनयुक्त उत्पादन वापरतात. ज्या उत्पादनाच्या वापराने अनेक वेळा चेहरा अधिक खराब होतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावरील पांढरे डाग कमी करायचे असेल, तर तुम्हाला शरीरातील पुढील विटामिनची कमतरता भरून काढावी लागेल.

‘या’ विटामिनच्या कमतरतेमुळे (Vitamin Deficiency) चेहऱ्यावर वाढतात पांढरे डाग

विटामिन सी

विटामिन सी आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. विटामिन सी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासोबतच चेहऱ्याची सौंदर्य वाढवते. शरीरामध्ये विटामिन सी ची कमतरता असते, तेव्हा चेहऱ्यावरील ओलावा कमी होतो. परिणामी चेहरा डीहायड्रेट होऊन चेहऱ्यावर पिंपल्स आणि इतर समस्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त विटामिन सी युक्त पदार्थांच्या सेवन केले पाहिजे.

विटामिन बी 6

विटामिन बी मध्ये विटामिन बी1, बी2, बी6 आणि बी12 यांसारख्या जीवनसत्वांचा समावेश होतो. जेव्हा शरीरामध्ये विटामिन बी 6 ची कमतरता होते, तेव्हा चेहऱ्यावर छोटे-छोटे पांढरे डाग दिसायला लागतात. त्यामुळे चेहऱ्यावरील पांढरे डाग कमी करण्यासाठी तुम्ही विटामिन बी 6 असलेल्या पदार्थांचे सेवन करू शकतात.

विटामिन बी 12

विटामिन बी 12 हा विटामिन बी ग्रुपचा खूप महत्त्वाचा भाग आहे. विटामिन बी 12 शरीरातील अनेक महत्त्वपूर्ण कार्य करते. शरीरामध्ये जेव्हा विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण होते, तेव्हा चेहऱ्यासह शरीरावर देखील पांढरे डाग दिसायला लागतात. त्यामुळे या विटामिन बी 12 कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, मासे, अंडी, मांस इत्यादी गोष्टींचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या