Walnut Water | अक्रोडाचे पाणी प्यायल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Walnut Water | टीम महाराष्ट्र देशा: अक्रोड (Walnut) खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात असे आपण नेहमी ऐकत असतो. पण तुम्हाला माहित आहे का? अक्रोडाचे पाणी (Walnut Water) देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. होय! अक्रोड खाल्ल्याने जेवढे शरीराला फायदे मिळतात तेवढेच अक्रोडाचे पाणी प्यायल्याने देखील मिळतात. अक्रोडमध्ये अनेक पोषक गुणधर्म आढळतात. यामध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम, फॉलेट, मॅग्नेशियम, प्रोटीन इत्यादी घटकांचा समावेश होतो. अनेकलोक रात्री पाण्यात अक्रोड भिजवून सकाळी त्याचे सेवन करतात. अक्रोडाचे सेवन करत असताना अक्रोडाचे उरलेले पाणी फेकून देतात. पण ते उरलेले पाणी फेकून न देता त्याचे सेवन केले पाहिजे. कारण त्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात. अक्रोडाच्या पाण्याची सेवन केल्याने तुम्हाला पुढील आरोग्यदायी फायदे मिळतील.

मेंदू निरोगी राहतो

मेंदूच्या स्वास्थ्यासाठी अक्रोड नेहमी फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर अक्रोडाच्या आकारामुळे त्याला ब्रेन फूड देखील म्हणतात. तर अक्रोडाचे पाणी प्यायल्याने तुमचा मेंदू निरोगी राहून तुमचे मन तीक्ष्ण होण्यास मदत होते.

मासिक पाळीमध्ये आराम मिळतो

महिलांनी मासिक पाळी येण्याच्या काही दिवसांपूर्वी अक्रोड किंवा त्याच्या पाण्याचे सेवन केले पाहिजे. अक्रोड किंवा अक्रोडच्या पाण्याचे सेवन केल्याने मासिक पाळीमध्ये होणाऱ्या तीव्र वेदनांपासून आराम मिळू शकतो. त्याचबरोबर याच्या सेवनाने मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

अक्रोड चवीला किंचित तुरट असते. पण नियमित अक्रोड किंवा अक्रोडाच्या पाण्याची सेवन केल्याने हार्मोन्ससह रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांना अक्रोडाच्या पाण्याची सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते.

शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते

अक्रोड किंवा अक्रोडाचे पाणी नियमित प्यायल्याने शरीरातील थकवा आणि अस्वस्थता यासारख्या समस्या दूर होतात. याच्यामध्ये असलेले पोषक घटक शरीराला ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे सकाळी अक्रोड किंवा त्याच्या पाण्याची सेवन केल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या