राज्यात कोरोनाचा उद्रेक; गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

Published On: 

मुंबई –  कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत.

राज्यातील रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत ८०६७ नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत  ८  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय. तर मुंबई मध्ये गेल्या २४ तासात ५४२८ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.  तर राज्यात ओमायक्रॉनची संख्या हि ४५४ वर गेली आहे.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य बातम्या
KrushiNama

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

🕘 संबंधित बातम्या