ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू; जाणून घ्या नवी नियमावली

मुंबई –  कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर  राज्यात २४ डिसेंबरला रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (३० डिसें)कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या संदर्भातील आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आले आहेत. यामध्ये खुल्या मैदानवर किंवा सभागृहातील विवाह सोहळ्यांमध्ये फक्त ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी असून सर्वच राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये देखील ५० लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल. तसेच अंतिम विधीसाठी स्मशानभूमीत फक्त २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. हे सर्व निर्बंध आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत.

दरम्यान, या बैठकीस आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, करोना कृती दलाचे डॉ़ संजय ओक, डॉ़ शशांक जोशी, डॉ़ अजित देसाई, डॉ़ राहुल पंडित आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –