Share

कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी नियमांचे पालन करा – राजेंद्र शिंगणे

Published On: 

🕒 1 min read

बुलडाणा – सध्या राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यातील रूग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यातील रूग्णवाढ लक्षात घेता आरोग्य यंत्रणेनी सज्ज रहावे. जिल्ह्यात सध्या सक्रीय रूग्णसंख्या वाढत आहे. तरी प्रत्येकाने तोंडावर मास्क वापरावा, लसीकरण केले नसल्यास लसीकरण करून घ्यावे, दुसरा डोस आलेल्या लाभार्थ्यांनी दुसरा डोस घ्यावा, गर्दीत जाणे टाळावे, सामाजिक सुरक्षा अंतर पाळावे. अशाप्रकारे कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येकाने नियमाचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी सूचना देताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सवडे, सहायक आयुक्त (औषध प्रशासन) श्री. बर्डे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालयांमधील ऑक्सिजनची व्यवस्था अद्ययावत करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, जिल्ह्यातील ऑक्सिजनची व्यवस्था पाहण्यासाठी स्वत: दौरा करणार आहे. तसेच अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे संयुक्त पथक गठीत करावे. या पथकानेही जिल्ह्यात दौरा करून सर्व रूग्णालयांमधील ऑक्सिजनचा पुरवठा, पाईप लाईन, ऑक्सिजनचा साठा आदींची पाहणी करावी. तसेच ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची चाचणी घेवून तपासणी करावी. जिल्ह्यात मागील लाटेत जास्तीत जास्त 18 मे. टन ऑक्सिनची गरज होती. त्यानुसार यावेळी नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पीएसए प्लँट सुरू करून तपासून घ्यावा. तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा. 15 ते 18 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण वेगाने पूर्ण करावे. त्यासाठी लसींची अधिकची मात्रा ठेवण्यात यावी.

ते पुढे म्हणाले, चाचण्यांची संख्याही वाढविण्यात यावी. सध्या आरटीपीसीआर किटचा पुरवठा 1000 चा होत असून गरज 15000 ची आहे. त्यानुसार मागणी नोंदविण्यात यावी. सिं. राजा येथे नवीन एलएमओ टँक बसविण्यात यावा. सर्व एलएमओ व पीएसए प्लँट सुरू करून पहावे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे.  मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध पोलीस विभागाने कारवाई करून रात्रीचा जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करावी. ओमायक्रॉन या नविन व्हेरींएंटचे रूग्ण असल्यास त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घ्यावा. त्यांची तपासणी करून घ्यावी.

जिल्ह्यात इयत्ता 1 ते 8 वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याबाबत पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी सुचना देवून शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.  सध्या 17 पीएसए प्लँट, 4 एलएमओ प्लँट व 45 ड्युरा सिलेंडर मधून 99.90 मे.टन ऑक्सिजनची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात पहिला डोसचे काम  90 टक्के पूर्ण झाले आहे. तर दुसरा डोसचे काम 65 टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात सध्या रेमडेसिवीर औषधांचा 5298 पुरवठा आहे, अशी माहिती यावेळी आरोग्य यंत्रणेने दिली.  बैठकीला संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या