Share

देशात कोरोनाचा उद्रेक; गेल्या २४ तासात 1 लाख 16 हजार 390 कोरोनाबाधितांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  देशात कोरोनाचे (Corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना(Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona)1 लाख 16 हजार 390 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत.  तसेच देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 64 हजार 848 1 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 4 लाख 82 हजार 876  लोकांचा मृत्यू झाला आहे.  देशात आतापर्यंत 145 कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात  36 हजार 265 नवे रुग्ण आढळले आहेत.  दिल्लीमध्ये  गेल्या २४ तासात  15 हजार 97 रुग्ण आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या