अवकाळी पावसाचा तब्बल 7 हजार 431 हेक्टर फटका; पिकांसह भाजीपालाचे मोठे नुकसान

Published On: 

नागपूर  – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) पाऊस  पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपूर  बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी , गुमथी, लोणखैरी, सावनेर , दहेगाव(रं), पारशिवणी ,  इटगांव, भागीमहारी, रामटेक , जमुनीया, टुयापार, घोटी, फुलझरी या भागात अवकाळी (Untimely) पावसाचा मोठा फटका बसला आहे.  या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात जवळपास 7 हजार 431 हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस,गहू,हरभरा, तूर,उ्न्हा ळी भुईमुग, भाजीपाला व संत्रा व टमाटर या फळपिकांचे नुकसान झाले आहे. 8 हजार 334 खातेधारकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अवकाळी पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला असून दीड हजार हेक्टरमधील तुरीचे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्या
KrushiNama

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

🕘 संबंधित बातम्या