दुधी भोपळ्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा (Milk thistle) रस पिणे हृदयरोग, मधुमेह, बद्धकोष्ठता, यकृताच्या समस्या, तसेच नैराश्य या समस्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून हा रस पिण्यास सांगितले जाते.

सकाळी उठून जर तुम्ही वर्कआऊट करत असाल तर दुधीचा रस जरुर प्यावा. रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने एनर्जी मिळते. तसेच दुधीच्या रसात ९८ टक्के पाणी आणि अँटी ऑक्सिडेंटस असतात. ज्यामुळे शरीरातील अशुद्ध घटक बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

दुधीच्या रसात कॅलरीज आणि फॅट्स नसतात. यामुळे तुम्ही वजन घटवत असाल तर दुधीचा रस प्यावा. यातील फायबर भूक कंट्रोल करण्यात मदत करतात. तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर सकाळी दुधीचा रस प्यायल्याने फायदा होतो. भोपळ्याचा रस दिर्घकाळ बंद बाटलीत असेल आणि चवीला थोडा जरी कडू लागला तरी तो खराब आहे असे समजावे आणि तो अजिबात पिऊ नये. कारण त्यातून गंभीर इजा उद्भवण्याची शक्यता असते.

महत्वाच्या बातम्या –