Share

वाशी फळ बाजारात कोकणातील हापूस आंबा दाखल

Published On: 

🕒 1 min read

वाशीतील फळ बाजारात आता कोकणातील हापूस आंब्याची आगमन झाली आहे. पाच डझनांच्या एका पेटीला तब्बल दहा हजारांचा दर मिळाला आहे. अवकाळी पावसाळामुळे आणि थंड वातावरणामुळे यंदाचा हापूस बाजारात उशिरा दाखल झाला. गतवर्षी हापूस आंबा नोव्हेंबर अखेरीस बाजारात दाखल झाला होता. मात्र, यावर्षी हापूसला जानेवारी महिना उजाडला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील बाजारपेठेत हापूस आंबा दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.

थंडीने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र गारठला

रत्नागिरीत सध्या हापूस आंबा प्रतिडझन २८०० ते ३००० रुपयाला विकला जात आहे. यावर्षी लांबलेल्या पावसामुळे ऑक्टोबरमध्ये येणारा आंब्याचा मोहोर आलाच नाही. त्यानंतर आवश्यक ती थंडी पडली नाही. त्यामुळे आंब्याला मोहोर धरला नाही. दिवाळीनंतरही पाऊस थांबल्यावर डिसेंबरच्या सुरुवातीला धरलेला मोहोर काही शेतकऱ्यांनी टिकवून ठेवला. त्यातून लागलेले आंबे आत्ता बाजारात आले आहेत.मात्र, हापूस बाजारात आला तरी तो महाग आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. पुढील महिनाभर हा दर असाच कायम असण्याची शक्यता आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)फळेबाजारभाव (Market Prices)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या