गैरहजर ग्रामसेवकांवर आता पुणे जिल्हा परिषद करणार कारवाई

पुणे :  छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी वा चिटणीस या नावाने ओळखतात. ग्रामसेवकाची निवड जिल्हा परिषदेकडून होते, व त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्याचे वेतन जिल्हा निधीतून होते. त्याच्यावर गटविकास अधिकारी यांचे नजीकचे नियंत्रण असते.

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतस्तरावरील कामे विचारात घेता, केंद्र, राज्य आणि जिल्हा परिषद स्तरावरून ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी येतो. त्यामध्ये नवीन योजना राबविण्यात ग्रामपंचायतीचे भूमिका ही सर्वात महत्वाची असते. तसेच गावातील नागरिकांमध्ये विकासकामे, योजनाचा लाभ मिळविण्यासाठी अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत. पण मात्र , ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीमध्ये हजरच नसतात जेव्हा केव्हा नागरिकांना त्याची गरज असते. त्यामुळे इतर कर्मचारी देखील ग्रामसेवकाचा कार्यालयात हजर नाहीत म्हणून ते ही कामानिमित्त चाललोय असे बोलून जातात. या सर्व कारणांमुळे गावकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत.

शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी मोफत सामायिक सुविधा केंद्र

शासकीय कामासाठी पंचायत किंवा जिल्हास्तरावर येताना ग्रामसेवकांनी गटविकास अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय ग्रामपंचायत मुख्यालय सोडायचे नाही. तसेच आठवड्यातील ठरलेल्या दिवशीच तालुकास्तरावरील कामासाठी ग्रामसेवकांनी उपस्थित राहावे. राहिलेल्या दिवसात कार्यालयामध्येच थांबून गावातील कामे आणि नागरिकांच्या अडचणींना न्याय द्यावा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहेत. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये गैरहजर असणाऱ्या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी नक्की करा हे घरगुती उपाय

गावामध्ये तर ग्रामसेवक जागेवरचराहत नाहीत, अशा तक्रारी वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे येत असतात. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ठोस भूमिका घेतली आहे. यापुढे ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांना मंगळवारी अथवा तालुक्याच्या आठवडे बाजार यापैकी ठरवून दिलेल्या दिवशीच तालुकास्तरावर उपस्थित राहता येणार आहे. त्याचबरोबर कोणत्या कामासाठी ते बाहेर जात आहेत याबाबतची माहिती ग्रामपंचायत कार्यालयातील नोंदवहीत लिहून ठेवावे. जर विनापरवानगी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेत आल्यावर ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या –

वस्तू खरेदी करून बिले संबंधित पंचायत समित्यांमध्ये सादर करा ; पुणे जिल्हा परिषदेने दिले आदेश

सरकारचा राधाकृष्ण विखे पाटलांना शह देण्याचा प्रयत्न

५५१ गावांपैकी ४४८ गावांना मिळाली जमीनमालकी