Share

डाळिंब खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

Published On: 

डाळिंब खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

भारतात डाळिंबाचे पीक सर्वत्र घेतले जाते. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे जास्त प्रमाणात डाळिंबाची पिके घेतली जातात. डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल माणकांसारखे दिसतात. डाळिंब मूळचे इराण व आफगाणिस्तानाकडील फळ आहे. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे डाळिंबाचं पिक घेतलं जातं. डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नाव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ.

  • शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.
  • डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.
  • डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

राज्यात आज आणि उद्या होणार मुसळधार पाऊस !

  • डाळिंबाच्या सालीचा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस चोखल्याने जुनाट खोकला नाहीसा होतो.
  • अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.
  • मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे यामुळे रक्तपडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा.

महत्वाच्या बातम्या –

कढीपत्त्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
डाळिंब खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

🕘 संबंधित बातम्या