आरोग्यदायी पालक भाजी, जाणून घ्या पालक भाजी खाण्याचे फायदे….

  • पालकाच्या एक ग्लास ज्यूसमध्ये चवीनुसार काळे मीठ टाकून सेवन केल्यास दम आणि श्वासाच्या आजारामध्ये लाभ होईल. ताज्या पालकाचा रस दररोज पिल्यास स्मरणशक्ती वाढते. यामध्ये आयोडीन असल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो.
  • तसेच कावीळ झालेल्या रुग्णाला पालकाचा आणि कच्च्या पपईचा रस एकत्र दिल्यास आराम मिळेल. लो ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज पालकाच्या भाजीचे सेवन करावे. यामुळे रक्तर प्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो असिड, प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक असिड भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार पालक ही शितल, मूत्रल, सारक, वायुकारक, पचण्यास जड, पित्तशामक, रोचक व वेदनाहारी आहे.
  • या सर्व गुणधर्मामुळे पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व सर्व आजारांमध्ये पथ्यकर अशी भाजी आहे. पालकामध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे यकृताचे विकार, कावीळ, पित्तविकार यामध्ये उपयुक्त आहे.

महत्वाच्या बातम्या –

गोव्याला सेंद्रीय शेतीसाठी केंद्र सरकार देणार 50 कोटींचा निधी

उद्धव ठाकरे आज नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर

जाणून घ्या, काय आहेत कापराचे घरगुती फायदे…

पावसामुळे तिसऱ्या यादीतील अकरावी प्रवेशांसाठी एक दिवसाची मुदतवाढ – शिक्षणमंत्री