Share

आवळा शरीरासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे

Published On: 

🕒 1 min read

आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, अॅन्टी-ऑक्सिडेट्सही असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून सामना केला जाऊ शकतो. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात १० ml आवळ्याचा ज्यूस मिसळून पिण्याने शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर जाण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…….

  • एक चमचा मेथीदाणा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट तयार करावी. या पेस्टमध्ये एक चमचा आवळा पावडर व एक चमचा दही मिसळावे. ही पेस्ट केसांना लावून एक तास ठेवावी. नंतर पाण्याने धुवावे.
  • तसेच आहारात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास केस जास्त गळतात आणि कोंडा होण्याची समस्या होते. पण आवळ्याचे सेवन केल्याने आणि आवळ्याच्या तेलाने केसांची मालिश केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. यासोबतच केस दीर्घकाळ काळे आणि दाट राहतात. याचप्रमाणे आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.
  • आवळा, आवळ्याचा ज्यूस उच्च रक्तदाब, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी आहे. अनेक डॉक्टर हाय ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.
  • आवळा हे फळ व्हिटामिन सीने समृद्ध आहे. मात्र, याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मूत्र मार्गात जळजळ होऊ शकते. बर्‍याच लोकांना मूत्र मार्गासंबंधित इतर समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो.
  • आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे. आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते. नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढते.
  • तसेच आवळ्यापासून च्यवनप्राश, कँडी, आवळा सुपारी, मोरावळा, लोणचे पाणावले जाते. रोजच्या आहारात याचे सेवन केल्यास पचनाच्या बाबतीतील समस्या दूर होण्यास फायदेशीर ठरते. जेवण अगोदर रोज आवळा या फळाचे सेवन करावे त्यामुळे पोटदुखी ,अपचन ,गॅसेस याना त्वरित अराम मिळू शकतो.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या