पौष्टिक अंजिराचे प्रक्रियायुक्त पदार्थ व त्याचे फायदे

अंजीर (शास्त्रीय नाव: Ficus carica, फायकस कॅरिका ; इंग्लिश: Common fig, कॉमन फिग 😉 हे एक मोठ्या आकाराचे झुडूप असते. हे झाड नैऋत्य आशिया आणि पूर्व भूमध्य विभागात (ग्रीस ते अफगाणिस्तानापर्यंत) आढळते. हे झाड साधारणत: ३ ते १० मी उंच वाढते. याचा दांडा करड्या रंगाचा असतो. या झुडूपाची पाने १२ ते २५ से.मी. लांब आणि १०-१८ सेंमी रुंद असतात. अंजिराचे फळ ३-५ सेंमी लांब असते. हे फळ कच्चे असताना त्याची साल हिरवी असते, तर ते पिकू लागल्यावर त्याचा रंग अंजिरी होऊ लागतो. या झाडाच्या चिकाने माणसाची त्वचा जळजळते.

अंजिराचे फायदे –

  • अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते.
  • अंजीरमधील पोटॅशियम घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
  • अंजीरमुळे शक्ती, उर्जा वाढते सोबतच एजिंगचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
  • अंजीरमध्ये फायबर घटक मुबलक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. ताजे आणि सुकवलेले अंजीर दोन्हींमुळे बद्धकोष्ठ्तेचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
  • ताजे अंजीर सालीसकट खाल्ल्याने अधिक फायदा होतो. त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर घटक असतात. रात्री झोपण्याच्या वेळेस 2 अंजीर खाणं अधिक फायदेशीर आहे.

अंजिराचे प्रक्रियायुक्त पदार्थ –

सुके अंजीर

पिकलेली चांगली फळे निवडावीत, त्याचा टीएसएस १६-१८ टक्के असावा. निवडलेली फळे स्वच्छ पाण्याने धुवून मसलीन कापडामध्ये बांधून १ टक्के केएमएसच्या द्रावणामध्ये २०-३० मिनिटे ठेवावित.
फळे थंड करून ड्रायरमध्ये एकसमान पसरून ५५-६५ अंश सेल्सिअस तपमानाला दोन दिवस ठेवावीत.
फळातील पाण्याचे प्रमाण १५-२० टक्के झाल्यास फळे सुकली आहेत असे समजावे.
सुकलेली फळे काढून थंड करून ती दाबून घ्यावीत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करावीत.
एक किलो ताज्या अंजिरापासून साधारणतः २५०-३०० ग्रॅम सुके अंजीर मिळतात.

पोळी

पिकलेली चांगली निरोगी फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत.
फळांची देठे काढून बारीक फोडी करून मिक्सरमधून बारीक करून घ्याव्यात.
मिक्सरमधून काढलेला गर मसलीन कापडामधून गळून घ्यावा.
एक किलो गरामध्ये १५०-२०० ग्रॅम साखर व ५ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून मंद आचेवर १५-२० मिनिटे शिजवावे.
शिजवलेले मिश्रण ट्रेमध्ये एकसमान पसरून वळवण्यासाठी ठेवावे.
वाळलेली अंजीर पोळी तुकडे करुन प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये भरून ठेवावी.

जॅम

४५ टक्के अंजीर गराचा टीएसएस ६८ टक्के असतो आणि यामध्ये ०.५ -०.६ टक्के आम्ल असते.
एक लिटर गाळून घेतलेल्या गरामध्ये ७५० ग्रॅम साखर आणि ५-६ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून स्टिलच्या पातेल्यामध्ये मंद आचेवर शिजवावे.
मिश्रण विरघळेपर्यंत आणि घट्ट द्रव होईपर्यंत हलवत राहावे. घट्ट झालेले मिश्रण चाचणी करुण निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून सीलबंद करावे.

आरटीएस

१० टक्के अंजीर गराचा टीएसएस १० टक्के असतो आणि यामध्ये ०.१ -०.३ टक्के आम्ल असते.
एक लिटर गाळून घेतलेल्या गरामध्ये १ किलो साखर आणि १-३ ग्रॅम सायट्रिक आम्ल व ९ लिटर पाणी मिसळून घ्यावे.
बनवलेले मिश्रण मंद आचेवर ५ मीनिटे गरम करून थंड करून घ्यावे थंड केलेले आरटीएस निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरुन फ्रीज मध्ये ठेवावे.

महत्वाच्या बातम्या –

पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे

लागवड गवती चहाची