चिंता वाढली! देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे.

तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona)  7 हजार 145  नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळे (Corona)  289 लोकांचा मृत्यू झाला. देशात सध्या 84 हजार 565 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच  देशात 3 कोटी 41 लाख 71 हजार 471 हजार रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत. तर आतापर्यंत  देशात तब्बल   4 लाख 77 हजार 158 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. १६ डिसेंबर पर्यंत देशात ८८ ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली होती, तर देशात गेल्या २४ तासात २५ रुग्णांची वाढ झाली आहे, तर देशात आतापर्यंत तब्बल ११३ ओमायक्रॉन  रुग्ण आढळले आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –