…तर देशात दिवसाला १४ लाख कोरोना रुग्ण सापडतील – नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांचे वक्तव्य

नवी-दिल्ली – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. मागच्या काही दिवसात कोरोनानंतर देशात सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची धास्ती आहे.

गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे(Corona) जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांना शुक्रवारी(१७ डिसें.)प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना भारतातील कोविड टास्क फोर्स आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल(Dr.V K paul) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

यावेळी बोलत असतांना पॉल यांनी ब्रिटनमध्ये मागील दोन दिवसांमध्ये वाढलेली रुग्णसंख्या आणि भारतातील परिस्थिती यांची तुलना करत चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भ बोलत असतांना पॉल म्हणाले की,’जर आपण ब्रिटनमध्ये अचानक पसरू लागलेल्या करोनाचा आवाका पाहिला आणि तशाच प्रकारचा रुग्णसंख्येचा उद्रेक भारतात झाला, तर देशात दिवसाला १४ लाख करोना रुग्ण सापडतील.’

दरम्यान, ओमायक्रॉन आल्याने शाळाबाबत चर्चा सुरु झाली असून ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा अंदाज घेऊन शाळांबाबत निर्णय घेऊ. स्थानिक लोकांमध्ये शाळेवरून निर्णय घेताना वाद होतात. त्यामुळे राज्य स्तरावरच याबाबत निर्णय घेणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या –