Share

काळजी घ्या! देशात गेल्या २४ तासात 1 लाख 59 हजार 632 कोरोनाबाधितांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  देशात कोरोनाचे (Corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना(Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबाधित

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona)  1 लाख 59 हजार 632  कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत.  देशात गेल्या 24 तासात 327 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे,  तसेच देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या5 लाख 90 हजार 611 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत  4 लाख 83 हजार 790  लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 3 कोटी 44 लाख 53 हजार 603 कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. देशात 3623 ओमायक्रॉनग्रस्तांची आतापर्यंत रुग्ण आढळले आहेत.  यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात , दिल्लीत आहे, महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून महाराष्ट्रातात 1009  ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलून आले आहे. दिल्लीत 513 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलून आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या