नवी दिल्ली – प्रधानमंत्री किसान (PM-Kisan) योजनेचा दहावा हप्त्या कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीची आहे कि पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता आज १ जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. आज १ जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत.
पंतप्रधानांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस अन्नदात्याला समर्पित करत पीएम किसान योजनेचा २,००० रुपयांचा १०वा हप्ता नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
धन्यवाद @narendramodi जी
🙏🙏💐💐 pic.twitter.com/jQXTZrEA6B— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 1, 2022
पंतप्रधान किसान (PM-Kisan) योजनेचे आत्तापर्यंत 9 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत तब्बल 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
नव वर्ष, 2022 का पहला दिन देश के अन्नदाताओं को समर्पित रहेगा। दोपहर 12:30 बजे वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए पीएम-किसान की 10वीं किस्त जारी करने का सौभाग्य मिलेगा। इसके तहत 20 हजार करोड़ रु की राशि के ट्रांसफर से 10 करोड़ से अधिक किसान परिवारों को लाभ होगा। https://t.co/g8IYegLJvI
— Narendra Modi (@narendramodi) December 31, 2021
पंतप्रधान किसान योजनेचे पुढीलप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा – यासाठी प्रथम तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा. नंतर त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल. त्यानंतर शेतकरी कॉर्नर विभागात, लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा. मग त्यानंतर तुम्ही ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर तुम्ही ‘Get Report’ वर क्लिक करा. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी कशी करावी? जाणून घ्या
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी आपण घरून नोंदणी करू शकता. यासाठी तुम्ही PM Kisan संकेतस्थळावर https://pmkisan.gov.in/ वर जा. यानंतर Farmers Corner’ अंतर्गत ‘Beneficiary Status’वर क्लिक करा. यासाठी आपल्याकडे आपल्या शेताचा सातबारा, आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल. हे केल्या नंतर तुम्हाला याचा लाभ मिळेल का याची माहिती मिळेल. प्रधानमंत्री किसान योजना.
महत्वाच्या बातम्या –
- नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकार कडून शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट; शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार ‘इतके’ रूपये
- ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू; जाणून घ्या नवी नियमावली
- घोळ मासा खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !
- ग्रामीण जीवन, संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाल्याने ग्रामीण युवकांना प्रेरणा मिळेल – अजित पवार
- शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – बच्चू कडू