Share

काळजी घ्या! देशात गेल्या २४ तासात 2 लाख 68 हजार 833 कोरोनाबाधितांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 2 लाख 68 हजार 833 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत.  देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

देशात  गेल्या २४ तासात 402 रुग्णांनी जीव गमावला आहे.  देशात सध्या 14 लाख 17 हजार 820  सक्रीय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत 4 लाख 85 हजार 752  रुग्णांनी जीव गमावला आहे.  देशात गेल्या २४ तासात 1 लाख 22 हजार 684 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.  देशात ओमायक्रॉनचे आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 6 हजार 41  रुग्ण आढळून आले आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News) आरोग्य

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या