Share

देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळे 453 लोकांचा मृत्यू; तर ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

Published On: 

देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळे 453 लोकांचा मृत्यू; तर ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

🕒 1 min read

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (corona ) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 200 रुग्ण आढळून आले आहेत.

तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (corona )  5 हजार 326  नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळे (corona )  453 लोकांचा मृत्यू झाला. तर देशात तब्बल 572 दिवसांतील सर्वात कमी सक्रिय रुग्णांची नोंद आहे. देशात सध्या 79 हजार 97 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच  देशात  3 कोटी 41 लाख 71  हजार रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत. तर आतापर्यंत  देशात तब्बल 4 लाख 77 हजार 554 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या

Join WhatsApp

Join Now
देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळे 453 लोकांचा मृत्यू; तर ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

🕘 संबंधित बातम्या