खामगावात २ हजार ४०० हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा पिकाची लागवड

खामगावात २ हजार ४०० हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा पिकाची लागवड jwari pik

खामगावगत झालेला प्रचंड पाऊस बघता, चालु रब्बी हंगामात पेरणीयोग्य क्षेत्रापैकी सुमारे २५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पिके बहरली आहे. सध्या पिकांची असलेली स्थिती पाहता, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा आहे. खामगावगत सुमारे  २२ हजार ४०० हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे शेतकरी आत्महत्या

साधारणपणे गत चार ते पाच वर्षांपासून रब्बीचे क्षेत्र सतत कमी झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता. परंतु गत पावसाळ्यात जिल्ह्यात सगळीकडेच जोरदार पाऊस झाला. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पुर्णत: हातून गेला होता. सगळीकडे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

वाहनांच्या वर्गानुसार त्यांची वेग मर्यादा निश्चित

पण सध्या हीच अतिवृष्टी रब्बी हंगामासाठी लाभदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच खामगाव तालुक्यात गत पाच ते सहा वर्षांच्या तुलनेत यावर्षी रब्बीचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला झाल्याचे दिसून येत आहे. एकूण २२४०० हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली असली तरी कांद्याची लागवड सुरूच असल्याने या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.