Periods Cramps | मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Periods Cramps | टीम कृषीनामा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रामुख्याने महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्यांना झुंज द्यावी लागते. या समस्या मुख्यतः हार्मोनियम बदलांमुळे होऊ लागतात. मासिक पाळीदरम्यान महिलांना पाठ दुखी, चक्कर येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी सुरू असताना महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात. यामध्ये काही महिलांना कमी तर काही महिलांना खूप जास्त वेदना होतात. त्यामुळे महिला या वेदना कमी करण्यासाठी केमिकलयुक्त औषधे घेतात. पण ही औषधे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे मासिक पाळीच्या वेदनेतून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. मासिक पाळीतील वेदांनापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकतात.

मेथी (Fenugreek

for Periods Cramps)

मेथी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीतील वेदनांवर मात करण्यासाठी तुम्ही मेथीचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला रात्री एक चमचा मेथी दाणे एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर सकाळी उठल्यावर तुम्हाला या पाण्याचे सेवन करावे लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या मासिक पाळीतील वेदना कमी होऊ शकतात.

हळदीचे दूध (Haldi Milk for Periods Cramps)

मासिक पाळीमध्ये हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने वेदना कमी होऊ शकतात. हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने पोट दुखणे कमी होऊ शकते. त्याचबरोबर या दुधाचे सेवन केल्याने सूज येण्याची समस्या देखील दूर होऊ शकते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये हळदीच्या दुधाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

दूध आणि काजू (Milk & Cashews for Periods Cramps)

मासिक पाळीतील वेदनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दूध आणि काजूचा समावेश करू शकतात. दुधासोबत काजूचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. मासिक पाळी दरम्यान तुमचे पोट खूप दुखत असेल, तर तुम्ही दुधासोबत काजूचे सेवन करू शकतात.

तिळाचे तेल (Sesame oil for Periods Cramps)

मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला तिळाच्या तेलाने पोटाच्या खालच्या भागाला मालिश करावी लागेल. तिळाच्या तेलामध्ये अँटिइप्लिमेंटरी आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आढळून येतात, हे गुणधर्म वेदना कमी करण्यास मदत करतात.

हर्बल चहा (Herbal tea for Periods Cramps)

मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी तुम्ही हर्बल चहाचे सेवन करू शकतात. या चहाचे सेवन केल्याने पोट दुखीची समस्या सहज दूर होऊ शकते. त्याचबरोबर या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही आल्याचा देखील चहा पिऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Weather Update | राज्यात ‘या’ भागात थंडीचा जोर वाढणार, हवामान खात्याने वर्तवली शक्यता

Alovera | केसांची काळजी घेण्यासाठी कोरफडीसोबत वापरा ‘या’ गोष्टी

Hair Mask | केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी वापरा ‘हे’ हेअर मास्क

Valentine Day | जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी ‘ही’ ठिकाणं ठरू शकतात सर्वोत्तम

Lemon Benefits | वजन कमी करण्यापासून ते इम्युनिटी पॉवर वाढवण्यापर्यंत ‘हे’ आहेत लिंबाचे अनोखे फायदे