Share

कापराचे घरगुती फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Published On: 

कापराचे घरगुती फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

कापूर केवळ पूजेसाठी वापरतात हे इतकंच साऱ्यांना ठावूक आहे. पण, कापूराचे अन्य अनेक फायदे आहेत, ज्यामुळे काही शारीरिक तक्रारीदेखील दूर होतात.चला तर मग जाणून घेऊ कापराचे घरगुती फायदे….

  • कापूर हा फक्त आपण पूजेसाठी वापरतो. पण त्या व्यतिरिक्तही या कापराचे बरेच फायदे आहेत. जर तुम्हांला भाजले असले तर कापूर किंवा कापराचे तेल लावावं. यामुळे जळजळ दूर होण्यास मदत होईल. तसेच घरात कापराचा धूर केल्याने जंतू नष्ट होतात. यामुळे आजारांचा संसर्ग होत नाही.
  • पोटदुखी होत असेल तर ओवा आणि पुदिना यामध्ये कापराचे तीन थेंब मिसळावे आणि ते घेतल्याने पोटदुखी बंद होते. स्नायू आणि सांधे दुखत असतील तर कापराच्या तेलाने मालिश करावी. यामुळे वेदना थांबतील आणि आराम देखील लवकर मिळेल. जे त्वचेला खाज येत असले तर ज्या भागावर खाज येते तेथे कापूर लावल्याने खाज येणे बंद होईल. तसेच जर तुमचा कान दुखत असेल तर तुळशीच्या पानांच्या रसात कापूर विरघळून थोडेसे कोमात करून कानात घालावं यामुळे कान दुखी बरी होईल.
  • तसेच दाट दुखत असल्यास वेदना होणाऱ्या ठिकाणी कापराची पावडर ठेवल्यास त्या ठिकाणी आराम मिळतो. घरात सुगंध दरवळत राहावा यासाठी कापूर वापरावा. कापराची वडी जाळून ठेवण्याने घरामध्ये सुवास नक्कीच पसरेल.
  • पाण्यामध्ये कापराच्या तुकड्यांची पूड करून मिसळावी, आणि ते पाणी घरात सगळीकडे शिंपडाव. त्यामुळे घरामध्ये मुग्यांचा त्रास कमी होईल. याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर ढेकण्याचा त्रास होत असले तर तो कमी करण्यासाठी कापराच्या वड्या एका कापडात बांधून ते बिछान्यात ठेवावं.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
कापराचे घरगुती फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

🕘 संबंधित बातम्या