जायफळचे हे औषधीय गुण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या जायफळचे अनेक फायदे…

सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय असलेले जायफळ आपल्या सर्वांना परिचित आहे. पदार्थांमध्ये वापरला जाणारा एक मसाला म्हणून जायफळाची ओळख आहे. जायफळ नेहमी आपल्या चवीने आणि सुगंधाने अन्नाला परिपूर्ण करते. म्हणूनच जायफळ अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. पण पदार्थांसोबत जायफळ हा बऱ्याच आजारांवर देखील रामबाण इलाज आहे.

जायफळामध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटिबायोटिक गुण आढळतात. त्यामुळे जायफळाचे सेवन तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकते. जायफळ तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन पासून सुद्धा दूर ठेवू शकते. काही वेळा तर जायफळाचे थेट पदार्थांमध्ये उपयोग केला जातो.

जायफळ या आजारांपासून दूर ठेवतो

सर्दी खोकल्यावर सर्वोत्तम उपाय आहे जायफळ

लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. अशा परिस्थितीत वातावरण बदलामुळे त्यांना लवकर सर्दी खोकला होतो. अशावेळी त्यांना जायफळ खाऊ घातल्यावर आराम मिळू शकतो. जायफळ हे संसर्ग दूर करण्यात प्रभावी ठरतात. सर्दी झाल्यास जायफळ नाकाला आणि कपाळावर लावावे. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. त्याचबरोबर खोकला येत असताना जायफळ बारीक करून मधात किंवा दुधामध्ये मिसळून घ्यावे. यासोबतच तुम्ही जायफळ बारीक करून तुपामध्ये मिसळून देखील नाकावर लावू शकतात किंवा त्याचे सेवन करू शकता.

फळाचे सेवन अपचनापासून मुक्त करते

लहान मुले असो किंवा प्रौढ व्यक्ती सर्वांमध्येच अपचनाची समस्या सामान्य झाली आहे. जायफळाचे नियमित सेवन केल्याने अपचन कमी होऊ लागते. तूप किंवा मधात मिसळून तुम्ही जायफळाचे सेवन करू शकता किंवा त्याला लहान मुलांच्या नाभीवर लावा यामुळे त्यांना अपचनाच्या समस्या पासून आराम मिळेल.

जायफळाच्या सेवनामुळे कान दुखी पासून होऊ शकता तुम्ही मुक्त

जर तुमचा कान दुखत असेल आणि त्यावर सूज येत असेल तर त्यावर तुम्ही जायफळ लावू शकता. जायफळ बारीक करून त्याची पेस्ट बनवून ती कानाच्या मागे लावा त्यामुळे कानाचे दुखणे आणि सूज कमी होईल. जायफळामध्ये आढळणारे अंटीबॅक्टरियल गुण कानाची घाण देखील साफ करतात.

महत्वाच्या बातम्या –