Coconut Water | दररोज नारळ पाणी प्यायल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Coconut Water | टीम कृषीनामा: नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना नारळाचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण या चवदार नैसर्गिक पेयामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे बहुतांश लोक त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी दररोज नारळाच्या पाण्याचे सेवन करतात. नारळाच्या पाण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. मात्र, दररोज या पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

बहुतांश लोकांना वाटत असते की दररोज नारळ पाणी पिणे ही चांगली सवय आहे. मात्र, नियमित नारळ पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तुम्ही जेव्हा रोज नारळ पाण्याचे सेवन करतात तेव्हा शरीरातील काही घटकांचे प्रमाण जास्त पटीने वाढते, जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. दररोज नारळ पाण्याचे सेवन केल्याने पुढील समस्या निर्माण होऊ शकतात.

लो ब्लड प्रेशर (Low Blood Pressure – Side Effect of Coconut Water)

दररोज नारळ पाणी प्यायल्यामुळे ब्लड प्रेशर कमी होऊ शकते. कारण नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळून येते. त्यामुळे रोज नारळ पाणी प्यायल्याने अचानक रक्तदाब कमी होण्याची शक्यता निर्माण होते. अचानक रक्तदाब कमी होणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे दररोज नारळ पाण्याचे सेवन करणे टाळले पाहिजे.

डायबिटीज (Diabetes – Side Effect of Coconut Water)

नारळाच्या पाण्याचे दररोज सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. नारळाच्या पाण्यामध्ये आढळणारी हाय-कॅलरी आणि शुगर लेवल डायबिटीसची समस्या वाढवू शकते. त्यामुळे तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नारळ पाण्याचे सेवन केले पाहिजे.

अतिसार (Diarrhoea – Side Effect of Coconut Water)

नारळाच्या पाण्याचे दररोज सेवन केल्याने लूज मोशनची समस्या वाढू शकते. कारण यामध्ये फर्मेंटेबल ऑलिगोसॅकराइड्स, डिसॅकराइड्स, मोनोसॅकराइड्स आणि पॉलीओल्स (FODMAPs) आढळून येतात, जे एक प्रकारचे शॉट चेन कार्बोहाइड्रेट असतात. हे आतड्यांमधून पाणी काढायचे काम करतात. त्यामुळे दररोज नारळ पाण्याचे सेवन केल्याने डायरियाची समस्या निर्माण होऊ शकते.

टीप: वरील माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Job Opportunity | IBPS यांच्यामार्फत भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज

Weather Update | ‘या’ राज्यांमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Health Care | रात्रभर ‘या’ गोष्टी पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्याने मिळतात अनेक फायदे

Job Opportunity | CDAC मध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू

Coconut Milk | केसांची काळजी घेण्यासाठी कोकोनट मिल्कचा ‘या’ पद्धतीने करा वापर