Coconut Milk | केसांची काळजी घेण्यासाठी कोकोनट मिल्कचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Coconut Milk | टीम कृषीनामा: केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा वापर करत असतो. यामध्ये प्रामुख्याने खोबरेल तेल (Coconut Oil) केसांना लावणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण खोबऱ्याचे तेल आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असते. हे तेल आपल्या केसांच्या अनेक समस्या दूर करते. पण तुम्ही कधी केसांची निगा राखण्यासाठी नारळाच्या दुधाचा (कोकोनट मिल्क) वापर केला आहे का? नारळाचे दूध आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये प्रोटीन, बी 1, बी 3, बी 5, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, इत्यादी पोषक घटक आढळतात. त्यामुळे नारळाच्या दुधाच्या वापराने केसांवरील अनेक समस्या दूर होऊ शकतात. त्याचबरोबर नारळाच्या दुधाच्या वापराने केसांच्या वाढीस चालना मिळते. केसांची काळजी घेण्यासाठी पुढील पद्धतीने नारळाच्या दुधाचा वापर करावा.

नारळाचे दूध आणि दही (Coconut Milk & Curd For Hair Care)

नारळाचे दूध केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केसांना कोकोनट ऑइल लावल्याने केस लवकर वाढतात. त्याचबरोबर केसांना अधिक पोषण देण्यासाठी तुम्ही नारळाच्या दुधासोबत दह्याचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे नारळाच्या दुधामध्ये एक चमचा दही आणि दीड चमचा कापूर पावडर मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते अर्धा तास केसांना आणि टाळूंना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस नियमित शाम्पूने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या नियमित वापराने केस मजबूत होतात आणि केसांच्या वाढीस चालना मिळते.

नारळाचे दूध आणि कोरफड (Coconut Milk & Alovera For Hair Care)

केस लवकर वाढवण्यासाठी तुम्ही नारळाचे दूध आणि कोरफडीची मदत घेऊ शकतात. केसांना कोरफड लावल्याने केस मऊ आणि चमकदार होतात. नारळाचे दूध आणि कोरफडीच्या मदतीने केसांची निगा राखण्यासाठी तुम्हाला दोन चमचे नारळाच्या दुधात एक चमचा कोरफडीचा गर आणि दोन-तीन तुळशीची पाने मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते केस आणि टाळूवर पंधरा मिनिटे लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागेल. या मिश्रणाच्या वापराने केसातील कोंड्याची समस्या सहज दूर होऊ शकते.

नारळाचे दूध आणि मध (Coconut Milk & Honey For Hair Care)

नारळाचे दूध आणि मध केसांसाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला चार चमचे नारळाच्या दुधात एक चमचा मध मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला किमान अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाचा वापर केल्याने केसांना पोषण मिळून केसांची लवकर वाढ होते.

कोकोनट मिल्क (Coconut Milk For Hair Care)

केसांना चमकदार आणि मजबूत बनवण्यासाठी तुम्ही फक्त कोकोनट मिल्क केसांवर लावू शकतात. कारण कोकोनट मिल्क हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये कोकोनट मिल्क घेऊन केसांच्या मुळापर्यंत ते लावावे लागेल. कोकोनट मिल्क केसांना लावण्यासाठी तुम्ही कापसाचा देखील वापर करू शकतात. कोकोनट मिल्क तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटे केसांवर ठेवून नंतर ते धुवावे लागेल.

कोकोनट मिल्क आणि लिंबू (Coconut Milk & Lemon For Hair Care)

केसातील कोंडा दूर करण्यासाठी कोकोनट मिल्क आणि लिंबू यांचा हेअर मास्क फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला अर्धी वाटी कोकोनट मिल्क घेऊन त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला साधारण चार ते पाच तास फ्रीजमध्ये ठेवावे लागेल. चार ते पाच तासानंतर तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला 30 ते 45 मिनिटे केसांना लावून ठेवावे लागेल. नियमित या हेअर मास्कचा वापर केल्याने तुमच्या केसांतील कोंडयाची समस्या दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Dead Skin | डेड स्किनच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Periods Pain | मासिक पाळीमध्ये खूप वेदना होत आहेत? तर करा ‘हे’ उपाय

South India Tour | ‘ही’ आहेत दक्षिण भारतातील छोटी पण अतिशय सुंदर ठिकाणं

Black Sesame Benefits | काळ्या तिळाचे सेवन केल्याने शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Job Opportunity | भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती! ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू