साखरेची विक्री किंमत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू

साखर बाजारातील मागणी व पुरवठ्यात ६१ लाख टनांची कमतरता असल्याने यंदा दर चढे राहू शकतात. साखरेची विक्री किंमत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, सद्य:स्थिती अनुकूल असली तरी कारखान्यांनी साखर निर्यातीवर भर द्यावा, असा सल्ला साखर महासंघाने कारखान्यांना दिला.

कोथिंबीर १८ हजार रुपये शेकडा बाजारभावाने विक्री

‘व्हीएसआय’च्या वार्षिक सभेसाठी मांजरी (जि. पुणे) येथे जमलेल्या साखर कारखानदारांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने काही मुद्दांवर उपाय सुचविले. व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी अभ्यासपूर्ण माहिती देत, “यंदा अनेक समस्या असल्या तरी हंगाम आशादायक आहे.

‘धड आहे आणि डोकं नाही, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे’

कारखानदारांनी अजिबात नाउमेद होऊ नये,” असाही सल्ला दिला. “साखर बाजार सध्या चांगले आहेत. केंद्रीय धोरणे, निर्यात, विदेशी बाजार, कमी ओपनिंग स्टॉक हे मुद्दे अनुकूल आहेत. मात्र, साखर निर्यात वाढवायला हवी. केंद्रासोबत अलीकडेच झालेल्या बैठकीत काही समस्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. साखरेचा किमान विक्री दर २९०० वरून ३१०० रुपये प्रतिक्विंटल करताना घसारा विचारात घेतलेला नाही. घसारा विचारात घेता ३३०० रुपये दर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे,” असे ते म्हणाले..